आपल्या पुढच्या सवयीची तयारी करताय तर थोडे थांबा कारण आम्ही घेऊन आलो आहे अशा काही सोष्टी ज्या तुमचा प्रवास सुरक्षित सोपा आणि आनंदी करतील . प्रवास म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असलेला एक विलोभनीय अनुभव प्रवास म्हटलं कि गोड-कडू अनुभव येणारच सगळ्याच गोष्टी आपापल्या मानस सारख्या होत नाहीत. आपण जितका प्रवास कराल तितकेच शहाणे व्हाल.कोणताही प्रवास असो त्याचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करणे बंधनकारक आल्याचे वाटते  कोठेही गिरवायला घेणे कि चांगले फोटोस घेण्यासाठी किंवा छान  दिसण्यासाठी आपले कपड्यांवर विशेष लक्ष असते. पण या सर्व गोष्टीं मध्ये आपण आला बोर्डिंग पास, पासपोर्ट अशा काही महत्वाच्या गोष्टी विसरून जातो यात नवल नाही.

ह्या आहेत अशा काही गोष्टी ज्या तुमचा प्रवास सुखद बनवतील 

आपला सुटकेस जितका मोठा तितकेच जास्त सामान आपण नेऊ शकतो असं वाटत असेल तर याने तुम्ही तुमचीच डोकेदुखी वाढवत आहे. तुम्ही घेतलेल्या अतिरिक सामानाचे ओझे तुम्हाला वाहावे लागणार आहे.एक किंवा दोन आठवडे लांब असलेल्या सहलीसाठी लहान किंवा मध्य आकाराची बॅग पुरेशी आहे. तुमच्या बॅगची साईझ आधीच ठरवल्यामुळे नको त्या गोष्टी न घेण्यास मदत होते. जर तुमच्या कडे पॅकिंग क्यूब असतील तर तुमचे काम अजूनच सोयीचे होईल. 

आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टीं साठी बॅगेचा एक कप्पा मोकळा ठेवा. त्यात बॅटरी,एक भौतिक नकाशा, मार्गदर्शक पुस्तक, आपल्या घरातील लोकांचे मोबाइल नंबर आणि बुक केलेल्या हॉटेल आणि ठिकाणांचे संपर्क एका डायरीत लिहून ठेवा. सर्व महत्त्वपूर्ण कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती घेऊन जाण्यास विसरू नका.

तुम्ही सहलीसाठी बाहेर जात असाल तर ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तुमचे ओले कपडे कॅरी करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट सुरिक्षत ठेवण्यासाठी पॉलीथिन बॅग नकीच उपयुक्त ठरेल .

आपल्याला आवश्यक असलेल्या  प्रत्येक गोष्टी साठी बॅग ओपन करण्याऐवजी आपल्या पासपोर्ट, तिकीट, लिप बाम इत्यादीसाठी एक छोटी बॅग कॅरी करा. किंवा जास्त पॉकेट्स असलेले कपडे परिधान करा जेणेकरून तुम्ही त्यात महत्वाच्या गोष्टी सहजपणे  हाताळू शकता.

सहलीला जाण्यापूर्वी नेहमीच स्वतःचा पावस मार्ग तयार करा. आपणास भेट द्यावयाच्या सर्व ठिकाणांची यादी ठेवा यादी तयार करा आणि आपण कधी व कोणत्या दिवशी त्यांना भेट देणार आहात याबद्दल तपशीलवार योजना तयार करा.

टॅक्सी, स्थानिक खाद्यपदार्थांची दुकाने आणि इतर गोष्टींसाठी आपल्याला आवश्यक असलेल्या रकमेचा अंदाज घ्या जेणेकरुन आपल्याकडे सहलीसाठी पुरेसे रोख पैसे असतील. ही एक महत्वाची ट्रॅव्हल हॅक्स आहे. 

आपली गोपनीयता धोक्यात न घालता, आपण कोठे चालाय, कोणत्या हॉटेलमध्ये आहात याबद्दल काही मूलभूत माहिती आपल्या ड्रायव्हरला कळू द्या.जेणेकरून  जर आपण आपले सामान कॅबमध्ये विसरलात तर ड्राईव्हरला हे माहित असेल कि तुमचे सामान कोठे सोडायचे आहे.परंतु हे सर्व करताना ड्राइव्हरसह खाजगी तपशील सामायिक न करण्याची काळजी घ्या.पण एक निरुपद्रवी संभाषण नकीच आपले साहाय्य करेल. 

कोणत्या ठिकाणी काय करावे आणि काय पहावे याबद्दल शिकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्थानिकांना विचारणे. काय मजा करायची, तसेच एखद्या ठिकाणी कमी वेळात कसे पोहोचायचे, तिथे चांगले जेवण आहे कि नाही आणि अश्या बऱ्याच काही गोष्टी तुम्ही याद्वारे जाणून घेऊ शकता. तसेच स्थानिक लोकांशी सवांद साधल्यामुळे  आपल्याला त्यांची संस्कृती आणि भाषा याबद्दल ही जाणून घेता येईल जे फक्त प्रवास करून स्पष्ट होणार नाही.