स्त्रियांसाठी एकाकी प्रवास करणे  काहीवेळा भीतीदायक असू शकते, खासकरून जेव्हा तुम्ही प्रारंभ करत असाल, स्त्रियांसाठी एकट्याने प्रवास करणे हेआनंदी, रोमांचक साहसी वाटू शकते परंतु वास्तविकता अगदी वेगळी आहे. एकट्याने प्रवास करणे स्त्रियांसाठी विशेषतः एवढे सोपे आणि आनंददायक नसते. 

प्रवास एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडू शकणाऱ्या चांगल्या गोष्टी पैकी एक आहे. प्रवासामुळे आपल्याला आश्चर्य आणि स्वातंत्र्य अनुभवायची अनुमती मिळते. आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी जगभरातील आश्चर्यकारक गोष्टी पाहणे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विलोभनीय प्रसंग ठरू शकतो. 

तथापि, जेव्हा आपण एकट्याने प्रवास करीय असाल आणि आपण एक महिला असाल, आणि तुमचा स्वतः वर आत्मविश्वास नसल्यास ते एक चुकिचा संकेत होऊ शकते. 

जर आपण महिला असाल आणि एकट्याने प्रवास करायचा विचार करीत असाल तर ह्या टिप्स तुमची नकीच मदत करतील . 

उच्च बॅटरी बॅक अप असलेली उर्जा बँक आपल्या पॅकिंग सूचीमधील सर्वात मोठी गोष्ट असावी . ज्याने तुम्ही तुमच्या परिजनांसोबत सतत संपर्कात राहू शकता  सहलीवर असताना तुमचा मोबाइल फोने बंद होणे तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. 
एखाद्या आपत्कालीन वेळी किंवा सूर्यास्ता वेळी तुमच्या मोबाइलला ची बॅटरी लो असणे तुम्हाला नकीच आवडणार नाही.

आपण एकट्याने प्रवास करत असताना, समाजातील विसंगत पुरुषांसोबत सवांद साधण्याची इच्छा तुम्हांला नकीच नसेल. एकट्याने प्रवास करताना रात्री बस किंवा लोकल ट्रेनमधून प्रवास करणे हा एक उत्तम पर्याय असू शकत नाही.कोणत्याही वाईट प्रसंगापासून सुरक्षित राहण्यासाठी वैयक्तिक  कॅब मधून प्रवास करणे योग्य ठरेल. कॅब बुक करण्याआधी तुम्ही ज्या कंपनी ची कॅब बुक करताय तिची पडताळणी करून घ्या 

तुम्हाला प्रवेश करताना कोणत्या गोष्टीची केव्हा गरज भासेल हे सांगता येत नाही वैदकीय मदत,हरवलेल्या बॅगची भरपाई, उड्डाण रद्द करणे किंवा इतर काहीही असू शकते. यासर्वांसाठी, प्रवास विमा आवश्यक आहे.

आपला बोर्डिंग पास किंवा हॉटेल आरक्षणाची पुष्टीकरण योग्य वेळेत न मिळाल्यास किंवा नकळत गहाळ झाल्यास तुम्हाला नाहक त्रासाला सामोरे जाऊ लागू शकते. तेव्हा आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी आपल्या मोबाइलला मध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे.जर तुमची तुमच्या कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी मेल संग्रह करून ठेवला तर ते अधिकच उत्तम म्हणजे तुम्हाला तुमची कागदपत्र कोणत्याही सिस्टिम मधून हाताळण्यात मदत होईल.

आपण जर एकटे प्रवास करत असला तर आपण नेहमी सतर्क राहणे आणि आपली स्वतःची सुरक्षितता नेहमीच सुनिश्चित करणे आवश्यक आहे,मोबाइलचा GPS  कायम ऑन  ठेवा ज्याने करून तुमचा मोबाइल हरवल्यास किंवा आपण मार्ग चुकल्यास तुमचा तसेच मोबाईलचा मागोवा घेणे सोपे जाईल. तसेच आपत्कालीन क्रमांक स्पीड डायल वर ठेवा. 

आपल्याला कितीही मुक्त आणि एकट्याने आपली सहल खर्च करावीशी वाटली तरीसुद्धा, घरी कोणालातरी आपल्या विमान आणि हॉटेलच्या तपशीलांसह अद्ययावत ठेवणे नेहमीच चांगले. जर कोणी आपल्यापर्यंत थेट पोहोचू शकत नसेल तर ते नेहमी तुम्ही वास्तव्य केलेल्या हॉटेलशी संपर्क साधू शकतात. हे आपल्या कुटुंबास बर्‍याच चिंतांपासून वाचवेल.

ड्रायव्हरशी बोलताना बेफिकीर होणे सोपे आहे. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही मुक्त विचाराचे असाल तरी आपण आपल्या सर्व गोष्टी एका अनोळखी व्यक्ती सोबत शेअर करणे हुशारीचे लक्षण नाही. जर आपल्याला एखादा वाहनचालक आपल्या सहलीच्या तपशीलांमध्ये खूप रस घेत असल्याचे आढळल्यास, ताबडतोब दुसरी टॅक्सी बुक करा आणि उतरताना तुम्ही बसलेल्या टॅक्सीचा नंबर नमूद करून ठेवा.