भविष्यात जेव्हा केव्हा ही परिस्तिथी आटोक्यात येईल तेव्हा माणस आपल आयुष्य पूर्वपदावर आण्यास बाहेर पडली तरी प्रवासा बाबतीतील त्यांचे मन नेहमीच संकुचित राहील . लोक लांबचा प्रवास करणे सहसा टळतील. देशात असलेल्या बहुतेक ट्रॅव्हल कंपनीचे दिवाळे निघाले आहे जवळपास पर्यटनाशी संबंधित सर्वच उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सर्वत्र पसरलेल्या या साथीच्या रोगामुळे भविष्यातील प्रवासावर कधीही न पुसला जाणारा प्रभाव टाकला आहे.
माझ्यासारख्या प्रवासासाठी उत्सुक असलेल्या असंख्य प्रवासवीरांचे मन अनेक विचारांनी भांबावून सोडले आहे.आपल्या पुढच्या सहलीचे नियोजन कधी, कसे आणि कोठे करावे याबद्दलचे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत.
1
मला वाटते की प्रवास आणि पर्यटनावरील कोविड १९ चा हा एक स्पष्ट परिणाम असेल.साथीच्या या रोगामुळे पर्यटन उद्योगाला ज्या प्रकारचा धक्का बसला आहे त्यातून सावरण्यात नकीच काही वर्षे लागतील. म्हणूनच हॉटेल, एअरलाइन्स आणि इतर प्रवासी सेवा स्वतःला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या किंमतीत वाढ करतील. त्यामुळे डील आणि ऑफर्स कमी होतील.
तुम्हाला वैयक्तिकरित्याही तुमचे ट्रॅव्हल बजेट वाढवावे लागेल आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स, बिझिनेस क्लास फ्लाइट्स, हेल्दी फूड अशा काही अतिरिक्त वस्तूंमध्ये अधिक गुंतवणूक करावी लागेल.
2
कोरोनाव्हायरसनंतरचा प्रवास कसा असेल हे सध्या माहित नसले तरी मला असे वाटते कि करोनानंतर कोणताही प्रवास करायचे असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे अनिर्वाय आणि आवश्यक असेल. योग्य काळजी न घेतल्यास तुम्ही कोरोना विषाणूचे वाहक बानू शकतात आणि तुमच्या सहित इतरांचे आरोग्यही धोक्यात आणू शकता. सध्या अनेक देश कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात दिवस रात्र एक करत आहेत. जेव्हा कधी हे लस तयार होईल तेव्हा कोणताही प्रवास सुरु करण्यापूर्वी ही लस घेणे बंधनकारक असू शकते.
3
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास परवानगी देण्यापूर्वी आवश्यक त्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी करणे किंवा थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक होईल. यामुळे केवळ संक्रमित व्यक्तीचा प्लॅटफॉर्मवर चढण्याचा धोका कमी होत नाही तर इतर लोकांच्या मनातील भीतीही कमी होते.
यामुळे कदाचित विमानतळावरील रांगा थोड्या लांब झाल्या असतील आणि आपल्या फ्लाइटसाठी आपल्याला नेहमीपेक्षा थोडा वेळ लवकर पोहोचावे लागेल.आपली वैद्यकीय तपासणी चालू असताना संयमाने रांगेत उभे रहाणे कदाचित त्रासदायक वाटू शकते पण त्याची टाळाटाळ करणे तुमच्यासाठी तसेच इतरांसाठी ही धोकादायक असू शकते.
4.
कोविड १९ द्वारे संसर्ग होण्याची भीती कायमचा लोकांच्या मनात घर करून राहील. त्यामुळे जेव्हा केव्हाही तुम्हाला परदेशी जायची वेळ येईल तेव्हा तुम्ही तिथे जास्त काळ घालवणे योग्य ठरणार नाही. आपण आपल्या बिसनेस मीटिंग चा किंवा परदेश वारीचा वेळ कमी केला तर छान आणि अर्थपूर्ण असेल. कोणत्याही ठिकाणी जास्त वेळ वाया घालवू नका कारण आपटककालीन परिस्तितीही पुन्हा कधी येईल हे आपल्याला माहित नसते.
0 Comments