व्यायाम आणि मानसिक आरोग्य यांच्यात गूढ संबंध आहे.नियमित व्यायामामुळे मानसिक आरोग्य सुधारते. प्रत्येकजण नक्कीच जाणतो की एक निष्क्रिय जीवनशैली वेगवेगळ्या तीव्र समस्यांना कसे योगदान देऊ शकते.असे असूनही, आपल्यापैकी किती जण आपली जीवनशैली सुधारण्यासाठी दररोज व्यायामावर लक्ष केंद्रित करतात? दिवसभरातील आमची मनोवृत्ती सुधारण्यात व्यायामशाळेत  मारलेली एक फेरी आपल्याला किती ताजेतवाने करू शकते हे आपल्या सर्वाना माहित आहे. 

व्यायामामुळे आपल्या शरीरात  एंडॉरफिन आणि एनकेफेलिन सारखे हार्मोन्स तयार होण्यास उतेजन मिळते.ह्या दोन हार्मोन्स ना आपापल्या शरीराचे फील-हार्मोन्स म्हणूनही ओळखले जाते. हे दोन हार्मोन्स आपल्या शरीरास  सकारात्मक उतेजन देऊन आपले मानसिक आरोग्य सुद्यारण्यास मदत करतात. 

व्यायाम आणि मानसिक आरोग्य यांचे संबंध अतिशय गुंतागुंतीचे आणि जटील आहेत.व्यायामामुळे मानसिक आरोग्य सुधारते मान्य आहे. परंतु, व्यायामाचे तुमच्या शरीरासाठी असलेले फायदे इथंवरच मर्यादित नाही नियमित व्यायाम केल्याने लठ्ठपणा, औदासिन्य, ऑस्टिओपोरोसिस आणि हृदयविकारांसारखे आजार दूर राहतात. 

दिवसभराच्या धावपळीमुळे खिन्न झालेल्या मनासाठी व्यायाम हा एक निश्चित असा मूड बुस्टर आहे. नियमीत व्यायामाने आपल्यामधील नैराश्याची आणि चिंतेची लक्षणे कमी होण्यास मदत होते.तसेच व्यायामामुळे आपल्या शरीरातील वाढलेली एंडोर्फिनची पातळी आपल्या शरीरात नवी चेतना निर्माण करते. 

दिवसभराच्या धावपळीमुळे खिन्न झालेल्या मनासाठी व्यायाम हा एक निश्चित असा मूड बुस्टर आहे. नियमीत व्यायामाने आपल्यामधील नैराश्याची आणि चिंतेची लक्षणे कमी होण्यास मदत होते.तसेच व्यायामामुळे आपल्या शरीरातील वाढलेली एंडोर्फिनची पातळी आपल्या शरीरात नवी चेतना निर्माण करते. 

विविध वैज्ञानिकानी या विषयावर केलेला अभ्यास असे दर्शवतो कि नियमित पणे  व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि तुम्ही तणावमुक्त राहण्यास मदत होते. व्यायामाचे असलेले हे नानाविध फायदे आपल्याला व्यायामाचा आणि मानसिक आरोग्याचा कसा संबंध आहे याची कल्पना देऊ शकतात. 

जेव्हा आपण नियमितपणे व्यायाम करतो  तेव्हा आपल्या ताणतणावाच्या पातळीत मोठी कपात दिसून  येते . नियमित काम आणि दैनंदिन जीवनातील अडचणींमुळे आयुष्यात खूप ताण येऊ शकतो जेणेकरून तुमचे मानसिक स्वास्थ्य खालावू शकते. व्यायामामुळे नॉरेपिनेफ्रिन सारख्या संप्रेरकांचे उत्पादन वाढून  तणाव कमी होतो.तणावमुक्त शरीराचा आणि व्यायामाचा असलेला हा संबंध आपल्या जीवनासाठी लाभदायक असाच ठरतो. 

व्यायामाचे आणि मानसिक आरोग्याचे फायदे अनेक आहेत. गेल्या कित्येक वर्षात झालेल्या अभ्यासामध्ये दिसून येते कि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी केलेले विविध व्यायाम मेंदूच्या नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. ज्या मेंदूची शक्ती आणि कार्यक्षमता वाढवतात. नियमित व्यायाम करणार्‍या लोकांमध्ये स्मृती कमी होण्याच्या समस्यांमध्ये  महत्त्वपूर्ण घट दिसून येते. केवळ हेच नाही तर यामुळे एखाद्या व्यक्तीची मानसिक उर्जा देखील सुधारते आणि आपला मेंदू इतरांपेक्षा अधिक सक्रिय ठेवण्यात मदत होते. भविष्यात तुम्हाला एखाद्या गोष्टी बदल विचार करणे कठीण जात असल्यास किंवा एखादी नवी गोष्टी करण्यात पेरणेचा अभाव वाटत असल्यास आपले शूज घाला आणि रस्त्यावर धडक द्या.सत्यावर मारलेली हे धडक निश्चितपणे तुमच्यात नवीन कल्पनांना वाव देईल. 

झोपेच्या  काही तास आधी योग्य प्रमाणात केलेली कसरत तुमचे मन शांत ठेवण्यास मदत करते. झोपण्यापूर्वी केलेल्या शारीरिक हालचालींमुळे शरीराचे तापमान वाढते आणि आपले डोळे थकून जाऊन झोपण्यासाठी तयार होतात आणि रात्री अकाली जग येत नाही. नियमित केलेल्या या गोष्टीमुळे तुमच्या  जागण्याची आणि झोपण्याची वेळ निश्चित होण्यास मदत होईल. 

नियमित व्यायाम आणि कसरतीमुळे प्राप्त झालेल्या सुदृढ आणि निरोगी शरीरामुळे आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान बळकट होतो आणि तुम्ही कोणतेही कार्य उत्साही पाने पार पाडण्यास सक्षम होता. 

व्यायामाचे इतर काही फायदे 
  • व्यायामामुळे मेंदूपर्यंत रक्तस्त्राव होण्यास मदत होते ज्यामुळे आपल्याला अधिक स्पष्टपणे विचार करता येईल.
  • व्यायामामुळे मेंदूच्या स्मरणशक्ती वाढवणाऱ्या भागाचा विकास होतो. 
  • नियमित व्यायामाने  मेंदू आणि मज्जातंतूंच्या पेशींमधील संबंधही मजबूत होतो. हे मेंदूला इजा आणि आजारांपासून वाचविण्यास मदत करते.
आपल्याला किती व्यायामाची आवश्यकता आहे?

शरीराच्या मध्यम ते गहण हालचालींसाठी दररोज ३० मिनटे व्यायाम करण्याची शिफारीश आरोग्य तज्ञ करतात. कधीकधी व्यायामाची प्रेरणा मिळवणे कठीण होऊ शकते. अशा वेळी तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देऊ शकतात. या गोष्टींमध्ये नृत्य करणे,धावणे किंवा गाण्यासारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो.