आयुष्य हे कधी कधी एका रोलर कोअस्टर राइड सारखे असते . आपल्या आयुष्यात जे काही चालू आहे त्यामुळे आनंद आणि स्थिरता क्षणिक दिसते. जीवनात असे काही दिवस असतात ज्या दिवशी तुम्हाला सर्व जग तुमचे असल्या सारखे वाटते आणि इतर दिवशी तुम्हाला अंथरुणातून बाहेर पडणे हे कठीण वाटू शकते.
आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांमुळे कदाचित तुम्हाला निराशा किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. जीवनात असे हे काही दिवस येतात जेव्हा तुम्हाला सर्व काही असह्य होऊ वाटते आणि तुम्ही स्वतः ला म्हणता “मी हे यापुढे करू शकत नाही” आपण तरी हे तुम्ही कसे बसे करता. परंतु हे तुम्हाला अस्वस्थ करणारी वागणूक आहे आणि त्या कडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. या गोष्टींकडे काळजीपूर्वक पाहणे महत्वाचे आहे जेणेकरून आयुष्यात कधी ब्रेक घेतला पाहिले हे तुम्हाला कळेल.
मानसिक थकवा केवळ तेव्हाच येत नाही जेव्हा आपल्या कडून एखादी चूक होते.बऱ्याचदा आपल्या मनात साठवलेल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल एकत्रिक विचार केल्या मुळेही आपल्याला मानसिक थकवा येतो. अशा थकव्या मुळे आपल्याला हातातील कामे पूर्ण करणे किंवा हाथाळने कठीण होते.
यामुळे कार्य किंवा वैयक्तिक जीवनासंबंधित निर्णय घेणे, लक्ष केंद्रित करणे, किंवा शांत राहणे कठीण होते.कधीकधी आपला मानसिक थकवा आपल्यावर इतका परिणाम करु शकतो की आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही.ज्याच्या परिणाम केवळ तुमच्या मनावरचं नाही तर वैयक्तिक जीवनावर परिणामी आरोग्यावर ही होतो.
चला तर मग जाणून घेऊया मानसिक थकवा येण्याची अशी चिन्हे जेणेकरून तुम्हाला ब्रेक हवा आहे कि नाही हे समजण्यास मदत होईल
आपल्या नेहमीच्या समान दिनचर्ये मुळे आपल्याला कंटाळा किंवा मानसिक थकवा आल्यासारखे वाटू शकते. जर आपण मासिक दृष्ट्या थकलेले असाल तर तुम्हाला आयुष्यात अपेक्षा करण्यासारखे काहीच सापडणार नाही आणि आपण कायम निराश राहाल. तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला त्रासदायक वाटू लागतील. तुम्हाला नेहमीच असे वाटेल कि तुम्ही जीवनात काही करू शकत नाही ज्यामुळे तुमचा जीवनाकडे तसेच भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
दैनंदिन जीवनातील सोप्या गोष्टींतही तुमचे मन लागणार नाही. तुम्ही एकटे राहणे पसंत कराल. आपल्याला कोणत्याही वैयक्तिक संबंधांबद्दल कुतूहल वाटणार नाही किंवा तुम्ही ते टिकवण्याचे प्रयत्न करणार नाही परिणामी तुमचे लोकांसोबत असलेले संबंध बिघडतील आणि तुमचा एकटेपण तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरेल
cry
निराशा हे तुमच्या जीवनाचा माफग होईल आणि तुम्ही स्वतः ला नेहमी अडचणीत पाहाल. आपल्या वर्तनात बदल होईल आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला ओझं असल्यासारखी वाटेल. तुम्ही सतत कोणत्यातरी दबावाखाली आणि नको त्या गोष्टींचा विचार करीत राहाल. ज्यामुळे तुम्ही भावनात्मक दृष्ट्या कमकुवत होऊ शकता आणि आयुष्यातील लहान समस्यांवर देखील रडण्यास सुरवात कराल. मानसिक थकवा येण्याचे हे एक प्रमुख कारण आहे
sleep
तुम्ही अंथरुणावर पडून राहता या आशेने कि झोपल्या वर तुमच्या समस्या काही अंशी दूर होतील पण असे होत नाही. सर्व मानसिक थकवा असूनही, आपला मेंदू झोपायला नकार देतो.कधीही न बदलणाऱ्या परिस्थितीबद्दलच्या विचारांसह तो वेगाने चालत असतो. आपली झोप विस्कळीत झालेली असते आणि त्यामुळे येणाऱ्या दिवशी आणि कामात त्याचा होणार त्रास तुम्हाला दिसून येतो. झोप न लागणे हे मानसिक थकव्याचे महत्वाचे कारण आहे.
angry
आपल्या जीवनात होणाऱ्या छोट्या गोष्टी ही आपणास संतप्त करु लागतात .आपल्या सभोवतालच्या जागेत जे काही घडते त्याचा आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे आपल्याला अत्यंत निराश वाटते. परंतु ,आपल्या कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक संबंधांसाठी हे धोक्याचे ठरू शकते. आपण आपला राग दुसर्या एखाद्यावर व्यक्ती वर काढू शकतो ज्याने तुमच्या सामाजिक जीवनात देखील समस्या निर्माण होतील. आपण हळू हळू आपल्या मनावरील ताबा गमवून बसाल आणि यामुळे आपल्या निराशेच्या पातळीत आणखीणच भर पडेल.
alone
तुम्हाला कोणतेही नाते सुरक्षित वाटणार नाही तसेच तुमच्या क्षणोक्षणी बदलणाऱ्या स्वभाव मुळे कोणीही तुमच्याशी मैत्री करण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे आपल्या भवन व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे हक्काच असं कोणीच नसेल. तुम्हाला नेहमी असे वाटेल कि दुसरी व्यक्ती आपल्याला पाहिजे तसे सांत्वन देऊ शकणार नाही.हे तुमच्या बाबतीतही तितकेच खरे आहे. आपणही एखाद्याच्या समस्या ऐकू शकत नाही किंवा त्यांना सांत्वन देऊ शकत नाही.मानसिक थकवा येण्याचे एक लक्षण म्हणजे नाते न टिकवू शकणे .
chinta
डोक्यामध्ये चाललेले सततचे विचार आणि थकवा तुम्हाला चिंताग्रस्त बनवू शकतात. नेहमी तणावग्रस्त असल्यामुळे मुळे तुमचे मन एका जागी स्थिर राहत नाही. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीं बदल काळजी करता जे आपल्या शारीरिक आरोग्यास देखील हानिकारक ठरते आणि अनेक रोगांना कारणीभूत ठरते.
bhuk na lagne
विश्रांतीचा अभाव आणि मानसिक थकवा तुमची शाररिक दुर्बलता वाढवू शकतो. जेव्हा आपण जास्त तणावात असता तेव्हा आपले शरीर योग्य प्रकारे काम करत नाही आपल्या डोकेदुकी किंवा मळमळ झाल्यासारखे वाटू लागते
जवळजवळ प्रत्येक वेळी जेव्हा एकादी व्यक्ती तणावात किंवा मानसिक दबावाखाली असते तेव्हा त्या व्यक्तीची पचनसंस्था मंदावते. तुम्हाला कदाचित जास्त खाण्यासारखे वाटणार नाही जे तुम्हाला कमकुवत बनवील ज्या मुळे तुम्ही तुमची कामे पूर्ण कार्यक्षमतेने पूर्ण करण्यास असमर्थ व्हाल .
तर खरा प्रश्न असा आहे कि आपण स्वतः ला मानसिक थकवा तुन कसे बाहेर काढू शकतो आणि तसेच मासिक थकव्याच्या या सर्व कारणांना कसे नियंत्रित करू शकतो.
मानसिक थकवा हाताळण्याचे काही मार्ग
जेव्हा आपली मानसिक स्थिती चांगली नसते तेव्हा कोणतेही महत्वाचे निर्णय घेणे टाळा आणि थोड्या वेळ विश्रांती घ्या. कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यासाठी तुमचे मन शांत असणे अत्यंत आवश्यक असते. थोडे दिवस आपला दिनक्रम अगदी सोपा ठेवा त्या मुळे आपला मूड हळूहळू आशावादी बनेल आणि मन शांत होईल. मन शांत ठेवण्यासाठी रोज ध्यान करा तसेच योग्य आहार घ्या. स्वतः ची योग्य काळजी घेल्याने मानसिक थकव्याची चिन्हे हळू हळू दिसेनाशी होतील.
कोणतेही बदल सहज होत नाही निकाल मिळवण्यासाठी थोडावेळ आणि धैर्य लागेल. परंतु एकदा हे बदल जीवनात कायमस्वरूपी स्थायी झाले कि त्यांचे फायदे दीर्घावधीसाठी असतील. आपल्या दैनंदिन जीवनात शरीरासाठी योग्य असलेल्या क्रिया आणि निरोगी आहाराचा समावेश करा. आपले शरीर आणि मन सक्रिय ठेवण्यासाठी या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.
तुम्ही तोंड देत असलेल्या सर्व चिंता आणि तणावाबद्दल एखाद्याशी समोरासमोर बोलण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा एखाद्या दुसऱ्या व्यक्ती च्या दृष्टिकोनातून मिळालेल्या सूचना आणि मार्गदर्शन आपल्या मनात असलेल्या बऱ्याच समस्यांचे निराकरण करण्यास मदत करू शकते. जरी एखादी व्यक्ती तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यास सक्षम नसली तरीही आपल्याला कळेल तुमच्या कडे असे कोणी तरी आहे जे तुमच्या व्यथा जाणून घेतील
प्रत्येक वेळी हे शक्य नसले तरी बर्याच वेळा आपला तणाव एखाद्या विशिष्ट परिस्थितीशी निगडित असल्याचे आपल्याला आढळेल. जर हे असे एखादे कार्य आहे जे आपल्याला सतत नाखूष आणि मानसिकरित्या थकवित आहे किंवा असा संबंध ज्या मध्ये तुम्हाला फक्त निराशाच भेटत आहे तर या तणावांना आपल्या जीवनातून दूर करण्याचा प्रयत्न करा. जर आपण या गोष्टी दूर करू शकत नसाल तर स्वतः ला पुन्हा सक्रिय करण्ह्यासाठी थोडा वेळ काढा.
आयुष्यात अजूनही सकारात्मक असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, आपल्या लहान कामगिरीची नोंद घ्या.आपण पुढे काय करणार याची संपूर्ण योजना तयार करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळी एक दिवस घ्या आणि त्याची चांगली योजना करा. मानसिक थकव्याच्या या चिन्हांपासून स्वत: ला मुक्त करण्यासाठी दररोज लहान पावले उचला.
0 Comments