कोरोना या साथीच्या रोग मुले पूर्ण देशाचेच आंही तर संपूर्ण जगाचे जण जीवन विस्कळीत झाले आहे त्यातच वर्क फ्रॉम होम चा नवीन ट्रेंड सध्या सुरु आहे बहुतेक लोक घरातूनच आपली ऑफिस ची दिनचर्या सुरु ठेवून आहेत पण घरा मधून काम करताना काही आरोग्यदायी सवयी आपण पाळल्या पाहिजेत . जाणून घेऊया अशाच काही चांगल्या सवयी ज्या तुम्हाला उत्साही पणे काम पूर्ण करण्यास मदत करतील .
सकाळी लवकर उठणे महत्वाचे आहे ज्याने करून तुम्ही तुमच्या संपूर्ण दिवसाचे योग्य नियोजन करू शकता. कोणत्याही कामाची सुरवात करण्या पूर्वी फ्रेश होणे अत्यंत महत्वाचे आहे यासाठी तुम्ही गरमागरम चहा किंवा कॉफ़ी घेऊ शकता स्वतः ला थोडा वेळ द्या. ज्याने करून दिवसभर आपण कोणत्या गोष्टींवर कार्य करणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला शांतपणे ठरवू शकाल. सकाळी लवकर उठल्यास तुम्ही स्वतः साठी पौष्टिक जेवण ही बनवू शकता तसेच फावल्या वेळेत थोडा वेळ व्यायाम ही करू शकता जेणेकरून आपण घरबसल्या दिवसासाठी पुरेसे कॅलरी बर्न कराल
तुम्ही जरी घरातून काम करत असाल तरी तुमच्या पोषाखाकडे दुर्लक्ष करू नका . व्यावसायिक पोषक परिधान करणे अत्यंत महत्वाचे आहे कोणत्याही व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा व्हर्च्युअल मीटिंग्जसाठी हे मूलभूत शिष्टाचार देखील आहे. पायजमा परिधान करणे नेहमीच आरामदायी असते पण खूपच आरामदायी कपडे तुमच्या झोपेस कारणीभूत ठरू शकतात. कामासाठी केलेली योग्य वेशभूषा आपले मन कामासाठी सज्ज करते तसेच आपल्या कुटुंबियांना ही आपण कामात आहेत हे निदर्शनास आणून देते.
तुम्ही काम करत असलेली जागा उजेड शीर आणि हवे शीर असणे महत्वाचे आहे . खिडक्या उघडा आणि ताज्या हवेचा श्वास घ्या आपण काम करत असताना खिडकी तुन येणारी थंड हवेची झुळूक नेहमीच आपल्याला रिफ्रेश करून जाते. खिडकी तुन येणाऱ्या उजेडा मुळे तुमच्या डोळ्यावर ही ताण पडणार नाही ज्याणेकरून तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. बाहेरून येणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि दरोरोजच्या वर्दळी मुळे तुम्हाला झोप ही येणार नाही .
जेव्हा तुम्ही घरातून काम करत असता तेव्हा तुमच्या शरीराची हालचाल होण्याची शक्यता खूप कमी असते. दिवसातून थोडा वेळ व्यायाम करणे आणि कसरत करणे महत्वाचे आहे.घरातून काम करण्याची उत्तम बाब म्हणजे ते तुमच्या दिनचर्येत फिट ही होऊ शकेल . जर तुम्ही घरात व्यायाम करण्यात सक्षम नसाल तर तुमचे काम २-३ टप्यात करणे तुम्हाला नकीच फायदेशीर ठरेल.
आपण ऑफिस मध्ये घेतलेल्या चहा आणि लंच ब्रेक प्रमाणेच वर्क फ्रॉम होम करतानाही लहान लहान ब्रेक घ्याल विसरू नका . तुमच्या विश्रांती ची वेळ निश्चित करा . वर्क डेस्क पासून थोडा वेळ दूर घालवणे नकीच तुम्हाला मदत करील.तसेच वर्क ब्रेकमुळे आपणास ताणतणाव असलेल्या कोणत्याही गोष्टीपासून आपले मन दूर करण्यास मदत होते.
आपला फोन बंद करा! किंवा आपल्या मित्रांना आणि कुटूंबाला सांगा की आपणास विशिष्ट तासांमध्ये कॉल करू नका, जेणेकरून आपण कोणत्याही अडथळ्याशिवाय कार्य करू शकाल. कामाच्या वेळी आपल्या मित्रांशी आणि कुटूंबियांशी बोलणे तुमच्या साठी निष्काळजी पणाचे लक्षण ठरू शकते आणि कदाचित आपल्या व्यावसायिक वातावरणासाठी हे चांगले नसेल
कामातील तणाव आणि घरातील इतर जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः ला प्रोत्साहित करण्यास विसरू नका. त्यासाठी केकचा तुकडा, एक उत्तम पुस्तक, रात्रीच्या जेवणासाठी पास्ता किंवा आपल्या मनाला आराम देणारी आणि दुसर्या दिवसासाठी आपल्याला तयार करणारी कोणतीही गोष्ट आवश्यक आहे. कामाच्या शिफ्टमध्ये कॉफीचा गरम कप देखील बक्षीस आहे कारण हे आपल्या मनाला ताजेतवाने करते.आपल्या उद्दीष्टांवर कटिबद्ध रहा आणि कठोर परिश्रम करत राहा .
आम्ही आशा करतो की घरातून काम करताना या निरोगी सवयींमुळे आपले काम सुलभ होईल
0 Comments